राजकोट – भाजप माझ्या हत्येचा प्लान आखत असल्याचा आरोप युवा काँग्रेस नेता हार्दिक पटेलने केला. हार्दिक पटेल यांच्या सुरेंद्रनगर येथील आक्रोश सभेत एका व्यक्तीने भरसभेत कानशिलात लगावल्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.
भाजपने आखला आहे माझ्या हत्येचा प्लान – हार्दिक पटेल
माझ्यावर हल्ला करण्याचा आणि मला ठार करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. अशाच प्रकारे हरेन पांड्या यालाही खोट्या चकमकीत ठार करण्यात आले होते. तुम्ही मला मारणाऱ्या माणसाचे फेसबुक प्रोफाईल पाहू शकता. भाजप नेत्यांशी तो संबंधित आहे, हे तुमच्या लक्षात येईल, असे हार्दिक पटेल याने म्हटले आहे.
एका व्यक्तीने हार्दिकचे भाषण सुरू असताना व्यासपीठावर चढून त्यांच्या कानशिलात लगावली होती. याबाबतची माहिती सुरेंद्रनगरचे पोलीस अधीक्षक महेंद्र बघेटिया यांनी दिली. कोणत्याही पक्षाशी हार्दिक यांना कानशिलात लगावणारी व्यक्ती संबंधित नाही. पोलिसांनी याविषयी तपास केला आहे. तो एक सर्वसाधारण नागरिक असल्याचे त्यांनी सांगितले.