आसाम मध्ये पर्यटनाबरोबर लुटा खरेदीची मजा

assam
भारताच्या ईशान्येकडील राज्यातील एक महत्वाचे आणि निसर्गसंपन्न राज्य म्हणजे आसाम. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासाचा बेत ठरत असेल तर आसामचा विचार नक्की करा. कारण येथे तुम्ही पर्यटनाचा आनंद मनमुराद लुटू शकालच पण येथील बाजारात खरेदीची मजाही अनुभवू शकाल. मुळात चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले हे राज्य. इथला चहा देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध. त्यामुळे सर्वप्रथम येथील चहाचे मळे पहा. काही ठिकाणी चहा विक्रीसाठी तयार होण्यापूर्वी त्यावर काय प्रक्रिया केल्या जातात, चहाची गुणवत्ता कशी ओळखायची हेही पाहायला मिळते. आसाम मधली पहिली खरेदी तुम्ही चहाची करू शकता. जालान टी मार्केट मध्ये विविध प्रकारचा चहा मिळू शकतो.

guwahati
माटी सेंटर हा गोहाटी मधील खास शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेला भाग. येथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. त्यातून तुम्ही तुमच्या आवडीच्या निवडू शकता. हे सेंटर पतीपत्नी चालवितात. त्यात ईशान्येकडील राज्यातील एनजीओ स्थानिक कलाकारांकडून बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी आणतात. स्थानिक हँडीक्राफ्ट साठी येथे आवर्जून भेट द्याच.

market
सिल्कालय मध्ये नावाप्रमाणे सिल्कच्या अनेक वस्तू म्हणजे साड्या, कपडे, पर्सेस मिळतात. आसामची सिल्कसाठी वेगळी ओळख आहे. येथे मुंगा, पॅट, इरी आणि मलबेरी असे विविध प्रकारचे सिल्क मिळते. खास विणलेल्या आसामी सिल्क साड्या तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील.

bajar
एनइडीएफआय हाट ही स्थानिक संस्थांनी चालविलेली संस्था. येथे प्रामुख्याने स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी असतात. बांबू पासून बनविलेल्या टोप्यापासून फर्निचरपर्यंत तसेच लाकडी सामान, धातूंच्या विविध वस्तू, मूर्ती, भांडी, शोभेच्या वस्तू जेथे जश्या मिळतात तश्या अन्यत्र मिळणे कठीण, तेव्हा येथेही खरेदी कराच.

Leave a Comment