प्रियंका चतुर्वेदींचा शिवसेनेत प्रवेश

priyanka-chaturvedi1
मुंबई – काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. चतुर्वेदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

प्रियंका चतुर्वेदी यांनी यादरम्यान माझे आणि महाराष्ट्राचे नाते फार जवळचे असून याच मुंबईत माझे लहानपण गेले आहे. तसेच कुठेच या राज्यासारखे राज्य नसल्याचे म्हटले आहे. माझ्या आवडीनुसार मला काम करायचे आहे. मला ते शिवसेना सारख्या संघटनेत करायला मिळेल म्हणून मी शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

Leave a Comment