‘ते’ चित्रपट पाहण्यासाठी करावा लागेल डिजिटल आयडीचा वापर

porn
केंद्रातील भाजप सरकारने पॉर्न चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यावर चांगलाच वाद पेटला होता. पण आता ते प्रकरण थंड झाले आहे. पण यापुढे जर तुम्हाला तसले चित्रपट पाहायचे असतील तर तुमच्या वयाची खरी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ब्रिटन हा असा निर्णय घेणार जगातील पहिला देश ठरला आहे. या देशात वयाची माहिती देण्यासाठी ओळखपत्रातील खरी माहिती द्यावी लागणार आहे. म्हणजे नुसते 18+ च्या बॉक्समध्ये क्लिक करुन चालणार नाही.

याबाबत इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार १५ जुलैपासून ब्रिटनमध्ये हा नवा कायदा लागू होणार आहे. ज्यानुसार इंटरनेटवर पॉर्न उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांना त्यांचा कन्टेंट बघणारा यूजर १८ वर्षापेक्षा अधिक असल्याची चौकशी करावी लागणार आहे. कारण लहान मुलांना या डिजिटल जगात धोकादायक साइट्सपर्यंत पोहोचणे सहज शक्य होत आहे.

वेगवेगळ्या वेबसाइट्सना हा नवा नियम लागू करण्यासाठी अनेक तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. जेणेकरुन यूजरचे खरे आणि योग्य वय कळेल. कंपन्यांनी जर असे केले नाही तर ब्रिटनच्या यूजरसाठी वेबसाइट बंद केली जाईल. ब्रिटनमधील संस्कृती, मीडिया आणि खेळ विभागाने सांगितले की, वयाची चौकशी करण्याची प्रक्रिया वेबसाइट्सवर कठिण ठरेल. कारण केवळ जन्मतारीख लिहिल्याने किंवा एखाद्या बॉक्समध्ये क्लिक करुन ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी यूजरला त्यांचे वय किती हे पटवून देण्यासाठी क्रेडिट कार्ड, पासपोर्ट किंवा डिजिटल आयडीचा वापर करावा लागेल.

रिपोर्ट्सनुसार, हा नियम लागू करण्याआधी ब्रिटन सरकारने लोकांची मते जाणून घेतली. त्यानंतर यावर संसदेत चर्चा झाली, वाद झाले. त्यानंतर हा नियम लागू केला. सर्व्हेही यासाठी करण्यात आला होता. ज्यात ७ ते १७ वयोगटातील लहान मुलांच्या ८८ टक्के आई-वडिलांनी या नियमाला सहमती दर्शवली होती.

Leave a Comment