तनुश्रीच्या टीकेला अजय देवगणचे सडेतोड उत्तर

ajay-devgan
‘मीटू’च्या आरोपात अडकलेले आलोक नाथ यांच्या अजय देवगणचा आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटामध्ये असण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजयवर याच प्रकरणात चहूबाजूंनी प्रश्नांचा भडीमार होत आहेत.

तनुश्री दत्तानेही या प्रकरणात अजयला अनेक गोष्टी सुनावल्या. अजयला फक्त तनुश्रीच नाही तर स्वतः विंता नंदाही म्हणाली की, अजयकडून मला अशी अपेक्षा नव्हती. आता अजयकडून या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण आले आहे. तनुश्री दत्ताला त्याने जशास तसे उत्तर दिले आहे.

अजयने या प्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हटले की, २०१८ च्या सप्टेंबरमध्येच दे दे प्यार दे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. तर हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण हा चित्रपट काही कारणांमुळे प्रदर्शित झाला नाही.

आलोक नाथबद्दल बोलायचे झाले तर ऑगस्ट महिन्यातच त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यांचे सर्वाधिक सीन मनालीमध्ये चित्रीत करण्यात आले. या शेड्युलचे शुटिंग ४० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले होते. आलोकवर जेव्हा मीटूचे आरोप करण्यात आले तोवर आमच्या या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. यानंतर बाकीचे स्टार त्यांच्या इतर कामात व्यग्र झाले.

अजय पुढे म्हणाला की, आलोक नाथ यांना रिप्लेस करणं अशक्य होते. आम्ही जर पुन्हा चित्रपटाचे चित्रीकरण केले असते तर निर्मात्याला फार मोठा आर्थिक भूर्दंड भरावा लागला असता. ‘मीटू’ची चळवळ जेव्हा सुरू झाली होती तेव्हा आम्ही स्पष्ट बोललो होतो की, महिलांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याविरुद्ध अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत. मी आजही माझ्या मतावर ठाम आहे.

Leave a Comment