राजू शेट्टींच्या प्रचारासाठी पोहचले प्रकाश राज

prakash-raj
सांगली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींच्या प्रचारसभेला जयकांत शिक्रे या खलनायकाची अजय देवगणच्या सिंघम चित्रपटात भूमिका केल्यानंतर देशभरात प्रकाशझोतात आलेले दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश यांनी हजेरी लावली. प्रकाश राज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींसाठी प्रचार केला. या निवडणुकीत प्रकाश राज हेही बंगळुरू सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

प्रकाश राज राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रभावित झाले असल्यामुळे राजू शेट्टी यांच्या प्रचाराला त्यांनी हातगणंगलेत हजेरी लावली. एनडीए सरकारमधून 2014 मध्ये भाजपसोबत असलेले राजू शेट्टी बाहेर पडले. त्यांनी राज्यातही महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर हातकणंगले मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचारात त्यांचे कुटुंबियदेखील सक्रीय दिसत आहेत. प्रकाश राज यांनी राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल कौतुक केले आहे. त्यामुळेच, अपक्ष उमेदवार असतानाही प्रकाश राज हे राजू शेट्टींच्या प्रचारासाठी हातकणंगले मतदारसंघात दाखल झाले. यावेळी, त्यांनी जाहीर सभेला संबोधितही केले.

Leave a Comment