या समलैंगिक महिला क्रिकेटपटु झाल्या विवाहबद्ध

married
मेलबर्न – न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेली जेनसन आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू निकोला हॅनकॉक या दोघींनी चक्क लग्नगाठ बांधली आहे. या दोघींच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवविवाहित जोडप्याचा फोटो मेलबर्न स्टार्सने अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
married1
न्यूझीलंडकडून 7 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणारी हेली जेलसन जलदगती गोलंदाज आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या निकोला हॅनकॉकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणच केलेले नाही. सध्या निकोला ही मेलबर्न स्टार्ससाठी बिग बॅश लीगमध्ये क्रिकेट खेळते. दरम्यान, गतवर्षी दक्षिण भारत क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू डेन वेन निकर्क आणि जलदगती गोलंदाज मारिजाने कॅप यांनी लग्नगाठ बांधली होती.

Leave a Comment