देशद्रोही साध्वी प्रज्ञाची ‘जीभ’च हासडली पाहिजे – संभाजी ब्रिगेड

sadhavi-pragya1
पुणे – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत पहिल्यांदाच भाजपच्या तिकीटावर भोपाळमधून निवडणूक लढवत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटत आहे. या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. हिंदुत्ववादी व हिंदुत्वाच्या नावावर विकृत विचारसरणी पेरणाऱ्या भगव्या दहशतवाद्यांचा खरा चेहरा हेमंत करकरे यांनी टरा-टरा फाडून टाकला. परंतु ‘शहिद हेमंत करकरे यांना मारल्यामुळे प्रज्ञा सिंह साध्वीचं सुतक संपले…? याचा अर्थ करकरे यांना मारणारे मास्टर माईंड व साध्वीचे बोलवते धनी आरएसएस रुपी कोण आहेत. भारतासमोर हे आज आलेला आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची ‘जीभ’ हासडली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.

मला हेमंत करकरेंनी चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, स्वत:च्या कर्मानेच त्यांचा मृत्यू झाला, असे धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. संतोष शिंदे यावर म्हणाले की, हेमंत करकरे, विजय कामठे, विजय साळसकर यांनी देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना ज्या दहशतवाद्यांनी मारले त्या दहशतवादाचा खोटा चेहरा भारतातील लोकशाही व न्यायव्यवस्थेनी ठेचला. भारतासमोर हू किल्ड करकरे…’! याचा अर्थ शहीद करकरे, कामठे व साळसकर यांना मारणारे खरे आरोपी कोण आहेत आले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

साध्वी प्रज्ञा सिंह मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. साध्वीचा अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटाचे व दहशतवादी हल्ल्याच्या गटांमध्ये सुद्धा हात आहे. भाजपकडून त्या देशद्रोही व्यक्तीला भोपाळमध्ये उमेदवारी देते व ती घेते हे या देशाचे दुर्दैव आहे. आज प्रज्ञा सिंह साध्वीने भाजपचा खोटा देशभक्तीचा बुरका टरा-टरा फाडून टाकलेला आहे. भाजप नेते व पंतप्रधान अशा देशद्रोही व्यक्तीला उमेदवारी देऊन समर्थन करतात हे या देशांमध्ये हिटलरशाही प्रस्थापित करण्याचे उत्तम उदाहरण असल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला.

Leave a Comment