अज्ञात व्यक्तींने हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावली

hardik-patel
अहमदाबाद – गुजरातच्या सुरेंद्र नगरमधील प्रचारसभेदरम्यान पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आली आहे. हार्दिक यांच्या एका अज्ञान व्यक्तीने कानाशिलात लगावली. नुकताच काँग्रेसमध्ये हार्दिक यांनी प्रवेश केला असून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी ते सभा घेत आहेत.

(व्हिडीओ सौजन्य-एबीपी माझा)
सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ हार्दिक पटेल सभा घेत आहेत. ते मतदारांना काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस उमेदवारास मत देण्याचे आवाहन करत आहेत. त्यासाठीच, सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तीची ओळख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. पण ती व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.

Leave a Comment