भारतीय वंशाच्या मुलीने दुबईत जिंकली कोट्यावधी रुपयांची लॉटरी!

lottery
दुबईमध्ये भारतीय वंशाच्या एका ९ वर्षीय एलिजा नावाच्या मुलीचे नशीब चांगलेच फळफळले आहे. या मुलीला चक्क ७ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. Dubai Duty Free’s Millennium Millionaire नावाची एक लॉटरी सिस्टम दुबईमध्ये आहे. गेल्या २० वर्षांपासून ही लॉटरी सुरु आहे. एलिजाच्या वडिलांनी तिच्या नावाने तिकीट खरेदी केली होती.

एलिजाच्या वडिलांनी सांगितले की, ९ नंबर हा त्यांच्यासाठी लकी असल्यामुळे ०३३३ नंबरची लॉटरी त्यांनी खरेदी केली होती. कारण याची बेरीज ९ होते. लकी ड्रॉ प्रक्रिया जेव्हा करण्यात आली तेव्हा ७ कोटींचे बक्षीस एलिजाच्या वाट्याला आले. एलिजाचे वडील एम हे एलिजाला फार भाग्यशाली मानतात. त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा एलिजा ३ वर्षांची होती तेव्हा याच लॉटरी सिस्टममध्ये त्यांनी एक लक्झरी कार जिंकली होती. एलिजाचे वडील हे मुंबईकर असून गेल्या १९ वर्षांपासून ते दुबईमध्ये राहत आहेत.

एलिजासोबतच आणखीही दोन व्यक्तींना या लकी ड्रॉमध्ये सरप्राइज गिफ्ट म्हणूण मोटारबाईक आणि कार देण्यात आली आहे. दुबईमध्ये २० वर्षांपासून राहणाऱ्या २३ वर्षीय भारतीय मोहम्मद हनीफ एडम आणि पाकिस्तानच्या मोहम्मद सफदर यांचा यात समावेश आहे.

Leave a Comment