बजाज ऑटोने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोहून छोटी कार

bajaj
नॅनोपेक्षा छोटी कार बजाज ऑटोने लाँच केली असून या कारचे नाव Qute क्वाड्रिसाइकल असे आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी वेरियंटमध्ये लाँच केली आहे. मुंबईत पेट्रोलवरच्या Qute ची किंमत आहे 2.48 लाख रुपये तर सीएनजीवर चालणाऱ्या कारची किंमत 2.78 लाख रुपये आहे.
bajaj1
216 सीसीचे सिंगल सिलिंडर ट्विन स्पार्क DTSi इंजिन या कारमध्ये दिले आहे. हे इंजिन 5,500rpm वर 13 बीएचपी पॉवर जनरेट करते. 4 जण या कारमध्ये बसू शकतात. Quteचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. इंजिन छोटे असल्यामुळे Qute 35 किलोमीटर प्रति लीटर अॅव्हरेज देते.
bajaj2
20 किलोग्रॅम Quteच्या बूटमध्ये वजन ठेवता येते. कारवरचा कॅरियर 40 किलोग्रॅम वजन सांभाळू शकतो. लांबी 2,752 एमएम, रुंदी 1,312 एमएम, उंची 1,622 एमएम आणि व्हिलबेस 1,925 Qute ची आहे. केरळ, राजस्थान, ओडिशा, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथे ही कार अगोदरच आली आहे. ही कार आज महाराष्ट्रात लाँच झाली.

Leave a Comment