प्ले स्टोरवरून गायब झालेल्या टिकटॉकचा शोध घेण्यासाठी युजर्सचा जुगाड

TikTok
बुधवारी आपल्या गुगल स्टोअरवरून गुगलने टिकटॉक अॅप काढून टाकल्यामुळे अँड्रॉईड आणि iOS प्रणालीच्या मोबाईलधारकांना आता टिकटॉक अॅप अजिबात डाउनलोड करता येणार नाही. हे जरी सत्य असले तरी… अल्पावधीत लोकप्रिय झालेले टिकटॉक अॅप असे अचानक बंद झाल्यामुळे भारतातील मोबाईलधारकांनी ते कसे डाउनलोड करता येईल याचा जावईशोध घ्यायला सुरूवात केली आहे.

टिकटॉक बंद होताच भारतातील युजर्सनी ‘how to download टिकटॉक’ असे ऑनलाइन सर्च करायला सुरूवात केली आहे. गुगल सर्च ट्रेंड्सच्या माहितीनुसार Download टिकटॉक आणि Download टिकटॉक App असे शब्द सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर टिकटॉक अॅप वर बंदी घालण्यात आली आहे यावर अनेकांचा विश्वासच बसलेला नाही. म्हणूनच की काय अनेकांनी खात्री करून घेण्यासाठी हे अॅप डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना यात अपयशच मिळाले आहे.

आणखी एक गोष्ट गुगल सर्च ट्रेंडच्या माध्यमातून समोर आली आहे की, मोबाईल युजर्सनी मोठ्या संख्यने Musical.ly हे सर्च केले. पण हे त्यावरून स्पष्ट होत नाही की ते टिकटॉक अॅप डाउनलोड करण्याचाच प्रयत्न करत होते. टिकटॉक सारखे अनेक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर आहेत. Vigo Video, LIKE Video, togetU हे त्यापैकीच आहेत.

प्राप्त माहितीनुसार जगभरात आत्तापर्यंत 100 कोटीपेक्षाही जास्त वेळा टिकटॉक अॅप डाउनलोड केले गेले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आले असले तरी, ते ज्यांनी आधीच डाउनलोड आहे, ते त्यांना वापरता येणार असल्याची माहिती आहे.

चीनमधील बाइटडांस (Bytedance) या कंपनीकडे गेल्या वर्षभरात चांगलंच लोकप्रिय झालेल्या टिकटॉक चे संपूर्ण अधिकार आहेत. सुरुवातीला कंपनीने म्यूजिकली (musical.ly) या नावाने हे अॅप लॉन्च केल्यानंतर टिकटॉक असा बदल नावात करण्यात आला.

Leave a Comment