प्रियंका गांधींबाबत उमा भारतींचे आक्षेपार्ह वक्तव्य

uma-bharati
दुर्ग : बहुजन पार्टीच्या प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादी पार्टीचे नेते आझम खान आणि भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

या सर्वांवर निवडणूक आयोगाने प्रचारबंदी घातली आहे. पण, बाकीच्या राजकीय नेत्यांवर निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतरही काही परिणाम होताना दिसत नाही. कारण, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्याबाबत केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. उमा भारती यांनी प्रियंका गांधी यांचा चोराच्या पत्नी म्हणून उल्लेख केला आहे.

मंगळवारी दुर्ग येथे प्रचारासाठी उमा भारती गेल्या होत्या. माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणात सक्रीय होण्याबाबत, तसेच प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांबाबतयावेळी प्रतिक्रिया विचारली होती. उमा भारती यांनी यावेळी माध्यमांसमोर प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. उमा भारती यांनी ‘प्रियंका गांधी चोराची पत्नी आहे आणि देश त्यांना त्याच नजरेने पाहणार,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले.

Leave a Comment