कॉपीराईटच्या वादात अडकले काँग्रेसचे प्रचारगीत

congress
धनबाद : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारगीत तयार केले असून ते ठिकठिकाणी जाहिरातींमध्ये वापरले जात आहे. पण, हे गीत आता वादात सापडले असून या गीताचे बोल आपल्या पतीच्या कवितेतील असल्याचा दावा धनबादच्या निवृत्त कर्नलच्या पत्नीने केला आहे. तिने यासंबंधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले आहे.

कर्नल जे के सिंह हे निवृत्त झाले असून हा आक्षेप त्यांची पत्नी नीतिका सिंह यांनी घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘मैं सारा हिंदुस्तान हूं’ हा कवितासंग्रह जे के सिंह यांनी लिहिला आहे. त्यांनी हे गीत नॅशनल स्टेडियमवर जमलेल्या 20 हजार माजी सैनिकांसमक्ष नुकत्याच 25 फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उद्घाटनावेळी म्हटले होते. भारतीय सेनेचे कर्नल जे के सिंह हे प्रसिद्ध उद्घोषक आहेत. लाईव्ह प्रसारणही या कार्यक्रमाचे झाले होते.

सिंह यांनी यापूर्वी या कविता संग्रहाचे प्रकाशन जालियनवाला बागेत 13 एप्रिल 2012 मध्ये केले होते. याच कविता संग्रहातून काँग्रेसद्वारे टीव्हीवर दाखविण्याचे येणारे ‘मैं ही तो हिंदुस्तान हूं’ हे गीत प्रेरित आहे. हा प्रकार कॉपीराईटचे उल्लंघन आहे. जर हे गीत काँग्रेसला पुढेही दाखवायचे असल्यास आपले संमतीपत्र त्यांनी घ्यावे. आम्हाला या बदल्यात पैसे नकोत. पण काँग्रेस पक्षाने झारखंडच्या कोणत्याही शहीद सैनिक किंवा पोलिसांच्या परिवाराला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नीतिका सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Leave a Comment