सोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसेनेच्या ‘अच्छे दिन’चे पोस्टर

shivsena
मुंबई – शिवसेना-भाजपची जरी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली असली तरी एकमेकांवर मागील चार वर्षांत केलेल्या आरोपाच्या पोस्ट आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना निवडणुकीपूर्वी थेट रस्तावर येऊन आंदोलन करत होती. भाजपच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या पोस्ट त्यावेळी विरोधकांकडून सोशल मिडियावर व्हायरल करण्यात येत आहे.
shivsena1
शिवसेनेकडून निवडणुकीपूर्वी भाजप सरकारच्या काळात प्रचंड महागाई झाल्याचे आरोप करण्यात येत होते. शिवसेनेने हेच का ‘अच्छे दिन’ अशी पोस्टरबाजी राज्यातील अनेक जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी केली होती. भाजप सरकार आल्यापासून पेट्रोल, डिझेलची दरवाढ व सरकार येण्यापूर्वीचे भाव यातील फरक दाखवणारे होर्डिग शहरात लावण्यात आले होते.
shivsena2
पण आता युती होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहण्याचे भाजप वर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत आहेत. आता सोशल मिडियावर आपल्या जुन्या पोस्ट आणि आंदोलनामुळे महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर भाजप विरोधात थेट रस्तावर उतरणारी शिवसेना ट्रोल होत आहे.

Leave a Comment