‘भारत’ची दोन नवी पोस्टर तुमच्या भेटीला

bharat
पुन्हा एकदा नव्या कथेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी येण्यास सज्ज झाली आहे. ते लवकरच ‘भारत’ चित्रपटातून एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. नुकतीच या चित्रपटातील दोन नवे पोस्टर रिलीज करण्यात आली असून सलमान आणि कतरिनाचा खास लूक प्रेक्षकांना यात पाहायला मिळत आहे.


पहिल्यांदाच कतरिनाचा हा लूक कदाचित तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. ती या चित्रपटातून एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे या पोस्टरवरून दिसत आहे. तर या चित्रपटात अनेक वेगवेगळे पात्र सलमान साकारणार असल्यामुळे, त्यांचा हा हटके अवतार त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास ठरणार आहे.


दरम्यान चित्रपटाचा ट्रेलरही येत्या आठवड्यात रिलीज केला जाणार आहे. येत्या ५ जूनला म्हणजेच ईदच्या दिवशी अली अब्बास जफर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment