राहुल गांधींवर टीका करताना हिमाचल प्रदेशच्या भाजपाध्यक्षाची जीभ घसरली

satpal-satti
शिमला – लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराला आता गती आली आहे. दरम्यान विरोधी पक्षांवर विविध जागी सभांना संबोधित करताना टीका करते वेळी भान हरपून बरळतानाही काही नेते दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसाठी चक्क आईवरून हिमाचल प्रदेशच्या भाजप अध्यक्षांनी अपशब्द वापरल्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भाजपची हिमाचल प्रदेश येथील सोलन येथे एक जाहीरसभा होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सत्ती यांचे यावेळी भाषण होते. त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यांनी गांधी यांच्या विरोधात त्यावेळी खुप खालच्या पातळीवर भाष्य केले. पण एक जबाबदार माध्यम संस्था म्हणून ते येथे लिहिणे शक्य नाही.

या व्यतिरिक्त काँग्रेसवर सत्ती यांनी ताशेरे ओढले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना अनेक वेळा चोर म्हटल्यावरुन टीका केली. स्वतः आणि स्वतःची आई जामीनावर बाहेर आहेत. मोदींवर कोणत्याही प्रकारचा साधा गुन्हाही दाखल नाही. मग राहुल गांधी स्वतः न्यायाधीश बनून, अशा प्रकारचा निर्णय देणारे कोण? पंतप्रधानांना चोर म्हणणारे गांधी यांना शिव्या देत असल्याचे सत्ती म्हणाले मात्र यानंतर त्यांची जीभ घसरली आणि राहुल गांधींबद्दल त्यांनी चक्क अपशब्द वापरले. सत्ती यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण मंडपात कार्यकर्ते हसत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे देशाचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Leave a Comment