जया प्रदा यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही – आझम खान

azam-khan
रामपूर – आपण अभिनेत्री आणि भाजप अभिनेत्री जया प्रदा यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचे आझम खान यांनी आज म्हटले आहे. खान यांच्याविरोधात रामपूर येथून जया प्रदा या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. येथे झालेल्या समाजवादी पक्षाच्या प्रचार सभेत खान यांनी जया प्रदा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर हे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे. दरम्यान खान यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जया प्रदाला मी रामपूरला आणले. कोणालाही तिच्या शरीराला मी स्पर्श करू दिला नाही, याचे तुम्हीही साक्षीदार आहात. तुमची १७ वर्षे तिचा खरा चेहरा ओळखण्यात निघून गेली. पण, मला १७ दिवसांतच माहिती झाले की, ती खाकी ….. ‘ असे अत्यंत खालच्या पातळीचे आक्षेपार्ह वक्तव्य खान यांनी प्रचार सभेत केले होते. पण, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना मी कोणाचेही नाव घेतले नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे. मी दोषी सापडलो, तर आताच्या निवडणुकीतील उमेदवारी मागे घेईन, असे आझम खान यांनी म्हटले आहे. आरएसएसच्या गणवेशामध्येही खाकी रंगाचा समावेश आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

Leave a Comment