रोमॅन्टिक चित्रपटात विद्युत जामवालची वर्णी

vidyut-jamwal
अलिकडेच अभिनेता विद्युत जामवालचा ‘जंगली’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सरासरी यश मिळाले आहे. एका रोमॅन्टिक चित्रपटासाठी आता विद्युतची वर्णी लागली आहे. तो दिग्दर्शक फारुख कबीर यांच्या आगामी ‘खुदाहाफीज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अलिकडेच ‘खुदाहाफीज’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यापूर्वी नसीरुद्दीन शाह आणि शर्मन जोशी यांची भूमिका असलेल्या ‘अल्लाह के बंदे’ या चित्रपटाचे फारुख कबीर यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असेल. अॅक्शन सीनदेखील या चित्रपटात असणार आहेत. या अॅक्शन सीन्सला आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीम मार्गदर्शन करणार आहेत. विद्युतसोबत चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक हे दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यापूर्वी अभिषेक पाठक यांनी ‘प्यार का पंचनामा’, ‘दृश्यम’ आणि ‘रेड’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोरोक्को आणि केरळ या ठिकाणी ‘खुदाहाफीज’ या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला जुलै महिन्यात सुरुवात होईल. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अधिकृत माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment