नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राफेल डीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही नोटीस भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन बजावली आहे.
मोदींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधींना नोटीस
२२ एप्रिलपर्यंतची मुदत न्यायालयाने राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी दिली आहे. राफेल डीलमध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. या वक्तव्याचा राहुल गांधींनी चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध लावला असे न्यायालयाने म्हटले आहे. राफेल डीलच्या विषयात काही कागदपत्रांचा स्वीकार करण्यासंबंधी निर्णय घ्यायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कुठलीही टिप्पणी करण्याचा प्रश्नच नव्हता असे सर्वोच न्यायालयाने म्हटले आहे.