सभेवरील खर्चाचा हिशेब राज ठाकरे निवडणूक आयोगाला देतील – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj-chavan
अकोला – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवरील खर्चावरुन निर्माण झालेल्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली असून राज ठाकरे यांच्याशी संबंधित हा प्रश्न आहे आणि निवडणूक आयोगाला तेच योग्य उत्तर देतील, असे सांगत या वादावर अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले.

रविवारी दुपारी अकोल्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांना या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांच्या सभेवरील खर्चाच्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर राज ठाकरे यांचा हा प्रश्न आहे. ते बघून घेतील. ते निवडणूक आयोगाला योग्य उत्तर देतील, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांचे साम, दाम, दंड भेद हे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असून भाजपविरोधी मतांचे विभाजन करण्याचा हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment