मेलबर्न – इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघांनाही १ वर्षांची बंदी संपल्यानंतर संघात स्थान देण्यात आले आहे.
विश्चचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात स्मिथ-वॉर्नरची वापसी
Here's the Aussie squad out to defend their World Cup title!
More HERE: https://t.co/hDu02GtIWF #CWC19 pic.twitter.com/iRzjLWNGeZ
— cricket.com.au (@cricketcomau) April 15, 2019
स्मिथ-वॉर्नर जोडीवर चेंडू छेडछाड प्रकरणानंतर १ वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी मार्च महिन्यात संपली होती. दोन्ही खेळाडूंचे महत्व ओळखताना ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापनाने फॉर्मात असलेल्या पीटर हॅन्डसकोम्ब आणि जोश हेजलवूड यांना संघाबाहेर केले आहे. संघात स्टीव्ह स्मिथ परतला असला तरी कर्णधारपदी अॅरोन फिंचला कायम ठेवण्यात आले आहे.
आता थोडाच अवधी इंग्लंड येथे होणारी विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यासाठी शिल्लक आहे. भारतात जरी आयपीएल स्पर्धा सुरू असली तरी सर्वांच्या नजरा विश्वचषकाच्या संघनिवडीकडे लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताला भारतात आणि पाकिस्तानला हरवल्यानंतर जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध १ जून रोजी होणार आहे.
विश्वकरंडकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ – अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श , ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.