मुंबई – अद्याप कुठलाही तोडगा आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या बाबत निघाला नसल्यामुळे जेटच्या ११०० वैमानिकांनी आजपासून विमान न उडविण्याचा निर्णय घेतला होता. पण मुंबईत आज जेट एअरवेज व एसबीआय यांच्यात महत्त्वाची बैठक होत असल्यामुळे वैमानिकांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. जेट एअरवेजचे शेकडो कर्मचारी मुंबईतील अंधेरी परिसरातील जेट एअरवेज कार्यालयाबाहेर जमले आहेत.
‘जेट’च्या ११०० वैमानिकांनी घेतला विमान न उडविण्याचा निर्णय
जानेवारी २०१९ पासून जेट एअरवेजच्या अभियंता, पायलट व इतर कर्मचाऱ्यांना मासिक वेतन न मिळाल्यामुळे ‘नॅशनल एविटर्स गिल्ड’ने या संदर्भात ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. अद्याप कुठलाही तोडगा आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या बाबत न निघाल्यामुळे जेट एअरवेजची आज दिवसभरात केवळ ७ विमाने उडाली आहेत.