लहानपणी माझे ही लैंगिक शोषण झाले – प्रियंका चोप्रा

priyanka-chopra
नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या १० व्या वार्षिक जागतिक महिला संम्मेलनात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सहभागी झाली होती. लैंगिक अत्याचाराबद्दल यावेळी बोलताना प्रियंका म्हणाली की, मला असे वाटते की महिलांनाच जोडून शोषण हा शब्द आला आहे. महिलाच आता महिलांना मदत करायला पुढे आल्यामुळे आपल्याला ते गप्प करू शकत नाहीत आणि हे पाहून हिंम्मत अजून वाढते.

याच दरम्यान प्रियंका पुढे म्हणाली की, येथे बसलेल्या प्रत्येक महिलेला हा अनुभव माझ्यामते आला असेल. प्रत्येकवेळी आवाज उठवला जायचा पण ऐकणारे कोणी नव्हते. पण मला आता काही सांगायचे असेल तर मला नाही वाटत कोणी ऐकणार नाही. तसेच ती गोष्ट सांगायला मला लाजही वाटणार नाही. बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतात #MeToo ची सुरुवात केली होती. प्रसारमाध्यमांसमोर आपला अनुभव शेअर करताना तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

नाना यांच्याशिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींनी आलोक नाथ, साजिद खान, विकास बहल, अनु मलिक, कैलाश खेर यांच्यावरही शोषणाचे आरोप केले आहेत. प्रियंकाने त्यावेळीही आपला आवाज उठवला होता. प्रियंका म्हणाली होती की, ही चळवळ जर लोकांनी बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवली तर लोकांना ही चळवळ समजलीच नाही असे मी म्हणेन.

फक्त सिनेसृष्टीतच हे होते असे नाही तर या घटना इतर क्षेत्रातही होत असतात. माझ्यासोबत जे झाले ते फार आधी झाले. माझ्यासोबत ही घटना मी लहान असताना घडली. याबद्दल मी बोलत का नाही असा प्रश्न लोक मला विचारत असतात. अनेकांना माझ्याकडून फार अपेक्षा आहेत. याचा अनुभव माझ्या देशातील सगळ्याच महिलांनी घेतला आहे आणि त्या आजही सार्वजनिक ठिकाणी याबद्दल बोलण्याचे टाळतात.

Leave a Comment