राजकीय पक्षाला देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने दिली कोट्यावधीची देणगी

currancy
राजकीय पक्षाला देणगी म्हणून 220 कोटी रुपयांची देणगी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने दिली आहे. याबाबतचा खुलासा कंपनीकडून तिमाही अहवालात करण्यात आला आहे. त्यांच्या जमा खर्चांमध्ये याचा कंपनीने उल्लेख केला आहे. आतापर्यंत सर्वात मोठी देणगी टीसीएसकडून देण्यात आली आहे
currancy1
राजकीय पक्षाच्या इलेक्टोरल ट्रस्टला 220 कोटी रुपये देण्यात आले असल्याचे टीसीएसने म्हटले आहे. त्याचबरोबर टाटा समूहातील कंपन्यांनी आधीही इलेक्टोरल ट्रस्टला पैसे दिले आहेत. कंपनीने 2013 मध्ये स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टला पैसे दिले होते. 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2016 पर्यंत अनेक राजकीय पक्षांना या ट्रस्टने पैसे दिले होते. काँग्रेस आणि बीजू जनता दलाला यात सर्वाधिक पैसे दिले होते. यावेळी फक्त 1.5 कोटीच देणगी दिली होती.
currancy2
कार्पोरेट आणि राजकीय पक्षांमध्ये भारतात अनेक ट्रस्ट आहेत जे मध्यस्थी करतात यातील सर्वात मोठी ट्रस्ट प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट आहे. भारती ग्रुप आणि डीएलएफमार्फत यासाठी सर्वात मोठी देणगी ही दिली जाते. 2017-18 मध्ये एकूण जमा झालेल्या 169 कोटी रुपयांपैकी 144 कोटी रुपये भाजपला दिले होते. टाटाच्या प्रोग्रेसिव इलेक्टोरल ट्रस्टने मात्र, 2017-18 मध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी दिली नाही.

Leave a Comment