शुक्रवारी होतात सर्वांत जास्त ब्रेकअप

breakup
प्रेम म्हटले की धोका आलाच, तो कधीही कुठेही आणि कधीपण होऊ शकतो. त्यामुळे ब्रेकअप कधीही कुठेही आणि कोणत्याही क्षणी होऊ शकते. पण नुकतेच एका संशोधनातून ही अजब गोष्ट समोर आली आहे.

कुठल्याही कारणावरून कोणत्याही क्षणी धोका दिल्याची आपण उदाहरणे पाहिलीच असतील. पण एका संशोधनातून शुक्रवारी सर्वांत जास्त ब्रेकअप होतात असे समोर आले आहे. बहुदा शुक्रवार हा ब्रेकअप करणाऱ्यांसाठी प्रिय वार असावा. इंटरनेटवर शुक्रवारी ब्रेकअप यावरून अनेक कोट आणि स्टेटसही पाहायला मिळतात. संशोधनानुसार शुक्रवारी जास्त ब्रेकअप होतात. शुक्रवारी तुमचा जोडीदार बहाणे सांगत असेल तर तुम्ही समजायला हवे की आपल्याला प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे.

हे संशोधन एका वेबसाईटच्या आधारे करण्यात आले होते. या अभ्यासात वेबसाईटशी जोडलेल्या अनेक लोकांची ब्रेकअप शुक्रवारी झाल्याचे समोर आले. अशा प्रकारची कारणे किंवा बहाणे 100 पैकी 74 लोक शोधत असतात. जे लोक प्रेमात धोका देतात ते स्वत:चे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगत असतात. त्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. धोका देणारे पार्टनर आठवड्यातून दोन वेळा भेटण्याचा आग्रह करतात. त्याचबरोबर मंगळवारी आणि दुसऱ्या एखाद्या दिवशी भेटणे अधिक पसंत करतात. यात 64 टक्के लोकांचा समावेश असल्याचे संशोधनात सांगण्यात आले आहे.

Leave a Comment