मला मतदान न करणाऱ्यांना शाप देणार – साक्षी महाराज

sakshi-maharaj
नवी दिल्ली – भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांसाठी चांगलेच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साक्षी महाराजांनी मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईन असे म्हणत स्वतःलाच मत देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. मी एक संन्यासी असून मला तुम्ही निवडून दिले तर मी निवडून येईन आणि निवडणुकीत जर पराभव झाला तर देवळात भजन किर्तन करत बसेन. पण मी तूर्तास तुमच्याकडे मत मागत आहे, तुमच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरतो आहे.

पण मला जर तुम्ही नाकारलत तर मी तुम्हाला शाप देईन, मी तुमच्या आयुष्यात असलेला आनंद हिरावून घेईन असेही साक्षी महाराजांनी म्हटले आहे. अद्याप भाजपने साक्षी महाराजांच्या वक्तव्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या संदर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्र संकेतस्थळाने दिले आहे. साक्षी महाराज हे भाजपचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत. उन्नाव मध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आता साक्षी महाराज येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा खासदार होऊ इच्छित असल्यामुळे त्यांनी दारोदार हिंडून मते मागण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment