जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याची किंमत ठरवता येईना

diamond
जगातील सर्वात महागडा हिरा म्हणून ओळखला जाणारा ‘लेसदी ला रोना’ हा हिरा विक्रीला काढायचा आहे. पण त्याच्या किमतीचा अंदाज कोणालाच येत नाही. जीआयए द्वारा जगातील सर्वात मोठा स्क्वायर कट डायमंड ‘ग्रास लेसदी ला रोना’ प्रमाणित आहे. सर्वात रंगीत आणि जास्त पारदर्शी असा हा हिरा आहे. हिऱ्याची किंमत हा हिरा विकणारी ब्रिटनची कंपनी ग्राफने अजून सांगितली नाही. हा स्क्वायर हिरा 302.37 कॅरेटचा आहे.

हा हिरा 2015मध्ये आफ्रिकेतील बोस्तवाना खाणीतून मिळाला. त्याचे वजन तेव्हा 1109 कॅरेट होते. जगातील हा दुसरा सर्वात मोठा असलेला रफ हिरा होता. 2017मध्ये ब्रिटनच्या ग्राफ कंपनीने तो 5.3 कोटी डॉलर्स देऊन खरेदी केला. 18 महिने या हिऱ्यावर काम केले गेले. एवढ्या मोठ्या हिऱ्याला पैलू पाडणे कठीण काम असते आणि हे काम खूप सावधतेने करावे लागते. कारण एक चूक झाली तर ती खूप महागात पडू शकते.

Leave a Comment