मेक इन इंडिया विमानाला हवाई संचालनालयाने नाकारली परवानगी

amol-yadav
मुंबई – भारतीय बनावटीचे विमान वैमानिक अमोल यादव यांनी तयार केले असून हवाई संचालनालयाने या विमानाच्या उड्डाणाला परवानगी नाकारल्यामुळे आपल्या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्याच्या तयारीत अमोल यादव आहेत.

६ वर्षे अथक परिश्रम घेऊन भारतीय बनावटीचे विमान भारतीय वैमानिक अमोल यादव यांनी तयार केले. सध्या या विमानाच्या उड्डाणाची परवानगी त्यांना हवी आहे. त्यांनी यासाठी डीजीसीए अर्थात हवाई संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे. पण या मागणीला हवाई संचालनालयाने यादव यांच्या हिरवा कंदिल न दिल्यामुळे या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्याचे प्रयत्न यादव यांनी सुरू केले आहेत. मेक इन इंडियाचा एकीकडे गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे हवाई संचालनालय मेड इन इंडिया विमानाला परवानगी नाकारत असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment