इम्रान खानच्या ‘त्या’ वक्तव्याचा ओवेसी यांनी घेतला समाचार

Asaduddin-Owaisi
सोलापूर – काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असून काश्मिर कोणाच्या बापाची जहागीर नसल्याचे म्हणत पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सोलापूरात वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरून एमआयएम सुप्रीमो असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत यावेत, अशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आशा व्यक्त केल्याचे वृत्त पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांनी आणि इतर काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा भाजप सरकार आल्यास शांततेवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे इम्रान यांनी म्हटल्याचे यात सांगण्यात आले आहे.

Leave a Comment