सर्वोच्च न्यायालयाला देखील मान्य आहे चौकीदार चोर आहे

rahul-gandhi
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरुन हल्लाबोल केला. आज सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी दिलेल्या निकालानंतर राहुल गांधी यांनी आता सर्वोच्च न्यायालयाला देखील चौकीदार चोर असल्याचे मान्य आहे, असे म्हटले आहे. राफेल विमान खरेदी संदर्भातील काही कागदपत्रे लीक झाली होती, सरकारने यावर आक्षेप घेतला होता. पण सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली ही कागदपत्रे मान्य असल्याचे न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत म्हटल्यामुळे हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का ठरला आहे. राहुल गांधींनी न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी साधला.

राहुल गांधी म्हणाले, राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाला हे आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. दरम्यान, मोदींना या प्रकरणी वाद-विवादासाठी त्यांनी खुले आव्हानही दिले. पंतप्रधानांनी केवळ १५ मिनिटे जर या चर्चेत भाग घेतला तर ते जनतेशी कधीही डोळे वर करुन पाहणार नाहीत, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेही हे मान्य केले आहे की, चौकीदार चोर आहे. राफेल प्रकरणात दोन लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. एक व्यक्ती नरेंद्र मोदी आहे तर दुसरी व्यक्ती अनिल अंबानी असल्याचे राहुल म्हणाले.

Leave a Comment