चक्क विमानतळाच्या फरशीवर पहुडले धोनी आणि साक्षी

dhoni
चेन्नई – काल खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या २३ व्या सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नई सुपर किंग्जने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर आज सकाळी संघ जयपूरकडे रवाना झाल्यानंतर महेंद्र सिंह धोनीच्या इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेअर करण्यात आला. साक्षी आणि धोनी या फोटोत फरशीवर झोपल्याचे दिसत आहे.


सोशल मीडियावर हा फोटो धुमाकुळ घालत आहे. त्यांचा हा फोटो चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशियल अकाउंटवर देखील शेअर करण्यात आला आहे. फॅन्स ज्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो शेअर करत धोनीने लिहिले, की जर आयपीएलच्या वेळेच्या आहारी गेलात आणि तुमची सकाळची फ्लाइट असेल तर तुमचे असेच हाल होणार.

Leave a Comment