660 कोटींचा मालक आहे कमलनाथ यांचा मुलगा

nakulnath
भोपाळ – आयकर विभागाकडून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर सुरु असलेल्या छापेमारीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच, 660 कोटींची संपत्ती त्यांच्या मुलाकडे असल्याची माहिती समोर आली आहे. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी छिंदवाडा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. कमलनाथ यांच्या संपत्तीपेक्षा नकुलनाथ यांनी जाहीर केलेली संपत्ती पाचपट जास्त आहे.

नकुलनाथ यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 615.9 कोटींची जंगम तर 41.77 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर नकुलनाथ यांच्या पत्नी प्रिया यांच्याकडे 2.30 कोटींहून अधिक जंगम संपत्ती आहे. नकुलनाथ यांच्या पत्नीकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. नकुलनाथ आणि त्यांच्या पत्नीकडे कोणतेही वाहन नाही आहे. दरम्यान प्रतिज्ञापत्रानुसार, 2017-18 मधील प्रिया यांची कमाई नकुलनाथ यांच्यापेक्षा अधिक होती. गतवर्षी नकुलनाथ यांनी 2.76 कोटींची कमाई दाखवली होती. तर त्यांच्या पत्नीची एकूण कमाई 4.18 कोटी एवढी होती.

Leave a Comment