निलेश साबळेवर फिदा बॉलीवूडचा भीडू

nilesh-sable
गेली चार वर्षे संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांनी आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर या कार्यक्रमातील होऊ दे व्हायरल हे पर्व देखील गाजले. त्याचबरोबर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस ‘चला हवा येऊ द्या’चं सिलेब्रिटी पर्व येणार आहे.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या चला हवा येऊ द्याच्या भागात आले होते. थुकरटवाडीतील विनोदवीरांनी त्यांच्या उपस्थितीत एकच कल्ला केला. आपाणी संवर्धनावर प्रेक्षकांसाठी मिर खान आणि किरण यांनी एक स्किट केले तर रंगीला या आमिर खानच्या सुपरहिट चित्रपटाचे थुकरटवाडीच्या कलाकारांनी धमाल विनोदी स्पूफ सादर केले. भाऊ कदम यात आमिर खान, तर श्रेया बुगडे उर्मिला मातोंडकर, तर निलेश साबळे जॅकी श्रॉफ साकारत होते.

आमिर खानने सर्व विनोदवीरांची या स्किटनंतर खूप प्रशंसा केली. त्याचबरोबर जॅकी श्रॉफने स्वतः त्यांचे हे स्किट पाहून निलेशच्या अभिनयाचे कौतुक केले. जॅकी श्रॉफ यांनी फोन करून निलेशची प्रशंसा केली. हा स्किट लय भारी झाला, असे देखील ते म्हणाले.

Leave a Comment