ट्विटरने लोकसभा निवडणुकीसाठी नियम बदलले

twitter
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर फेसबुक आणि व्हॉट्सअॅप पाठोपाठ आता ट्विटरनेही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्पॅम पाठवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी ट्विटरवर फॉलो करण्याची मर्यादा मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने कमी केली आहे. एका अकाउंटवरुन दिवसाला आता फक्त 400 नवे ट्विटर हँडल फॉलो करता येतील. सॅन फ्रान्सिस्कोच्या या कंपनीकडून जारी करण्यात आले की, आता यानंतर कुठल्याही यूझर एका दिवसाला 400 हून अधिक ट्विटर हँडल फॉलो करु शकणार नाही. ही मर्यादा पहिली 1000 होती.

याबाबत ट्विटरच्या सुरक्षा टीमने ट्वीट केले असून फॉलो, अनफॉलो, फॉलो, अनफॉलो, असे कोण करत? स्पॅमर्स. म्हणून एका दिवसाला फॉलो करण्याची मर्यादा 1000 हँडलहून 400 हँडलपर्यंत ट्विटरने कमी केली आहे. तुम्ही चिंता करु नका. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, असेही ट्विटरने स्पष्ट केले.

ट्विटरने लोकसभा निवडणुकांमध्ये भारतासाठी जाहिरात पारदर्शकता केंद्र स्थापन केले आहे. लोक याअंतर्गत राजकीय पक्षांच्या जाहिरातींचा तपशील तपासू शकतील. येथे जाहिराती देणाऱ्यांना जाहिरातींवर किती खर्च झाला हेही नमुद करावे लागते. राजकीय जाहिरातींसाठीचे नियम कंपनीने आणखी कठीण केले आहेत. सामान्य जनतेला ट्विटरच्या या नव्या सेवेमुळे कुठला पक्ष जाहिरातींवर किती खर्च करत आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच, समाजातील कुठल्या वर्गाला केंद्र करुन ही जाहिरात बनवण्यात आली आहे, हे देखील कळेल.

Leave a Comment