भारतात लाँच झाले बीएमडब्ल्यूचे नवे मॉडल

BMW
नवी दिल्ली : भारतीय बाजारापेठतील आपल्या वाहनांच्या किमतीत जर्मनीची प्रमुख कार निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यूने वाढ केली आहे. तसेच 2019 मध्ये कंपनीने नवीन मॉडल BMW Z4 Roadster लाँच केले आहे. दोन व्हेरिअंटमध्ये कंपनीने हे मॉडल बाजारात उतरवले आहे. हे दोन व्हेरिअंट sDrive20i आणि Z4 M40i असे असून अनुक्रमे 60 आणि 80 लाख रुपये या दोन्ही व्हेरिअंटची किंमत आहे.

बीएमडब्ल्यू कंपनीच्या गाड्यांचा लक्झरी आणि महागड्या कारमध्ये समावेश होतो. बीएमब्ल्यूच्या प्रत्येक कार आणि बाईक्स या महाग असतात. नुकतेच भारतामध्ये आपल्या कारचे कंपनीने लाँचिंग केले आहे आणि त्यांच्या किमतीतही कंपनीने वाढ केली आहे.

बीएमडब्ल्यूची नवीन कार टूसीटर असून या गाडीच्या Z4 M40i व्हेरिअंटमध्ये कंपनीने 3.0 लीटर क्षमता असलेला इनलाइन 6 सिलेंडर युक्त टर्बो इंजिन दिले असल्यामुळे कार 340 बीएचपी पॉवर आणि 500 एनएमचा टॉर्क जनरेट करते. कंपनीने sDrive20i व्हेरिअंटमध्ये 2.0 लीटर क्षमतेचे 4 सिलेंडर युक्त टर्बो इंजिनचा प्रयोग केला असल्यामुळे कार 197 बीएचपी पॉवर आणि 320 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच कंपनीने गाडीच्या sDrive20i मध्ये छोट्या इंजिनचा वापर केला आहे. कंपनीने दोन्ही व्हेरिअंटमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहेत.

4.5 सेंकदमध्ये Z4 M40i व्हेरिअंट 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. याशिवाय या कारचा टॉप स्पीड 250 किलोमीटर आहे आणि ही कार 12.82 प्रतिलीटर मायलेज देते. तर sDrive20i व्हेरिअंट 6.6 सेकंदमध्ये 100 किलोमीटर वेगाने धावू शकते. या कारचा टॉप स्पीड 240 किलोमीटर प्रतितास आहे. या कारला छोटे इंजिन असल्यामुळे 14.37 मायलेज देते.

Leave a Comment