विल स्मिथने शेअर केल्या भारत दौऱ्याच्या आठवणी

will-smith
हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथ काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आला होता. त्याने यादरम्यान हरिद्वारसह अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली. भारत भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ विलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.
will-smith1
भारतात येऊन विलला बराच काळ लोटला असला तरी त्याचे हेच फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. विल एका फोटोमध्ये देवाच्या समोर एकाग्रतेने ध्यान करताना दिसत आहे. याशिवाय तो गंगा आरतीच्यावेळी सर्वसामान्य जनतेसोबत गंगा घाटेवर बसलेला दिसला.
will-smith2
त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, मला माझी आजी नेहमी सांगायची की देव अनुभवातून शिकवत असतो. मला माझ्यातील कला आणि जगाच्या सच्चेपणाबद्दल अनेक गोष्टी भारत दौऱ्यावर असताना यात्रा आणि रंगांचा अनुभव करताना नव्याने कळल्या. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाइक केले आहे. विशेष म्हणजे हे पहिल्यांदा नाही जेव्हा विलने भारताबद्दल प्रेम व्यक्त केले. त्याने याआधी बॉलिवूडमध्ये काम करण्याचा आणि रिक्षा चालवण्याचा अनुभव शेअर केला होता.
will-smith3
इन्स्टाग्राम अकाउंटवर विलने एक फोटो शेअर केला होता तो ज्यात रिक्षाचा आनंद घेताना दिसत आहे. त्याने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, तुम्ही जेव्हा भारत दौऱ्यावर असता, तेव्हा तिथे पोहोचण्याचा फक्त एकच मार्ग आहे. विल स्मिथच्या बकेट लिस्टमध्ये विलची ही टुक टुक बॉलिवूडकडे वळली.
will-smith4
एक व्हिडीओ करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. विल स्मिथ ‘राधा तेरी चुनरी’ गाण्यावर यात थिरकताना दिसतो. मजेशीर गोष्ट म्हणजे या गाण्यात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि पुनीत मल्होत्राही विलसोबत नाचताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्टुडंट ऑफ दी इअर २ चित्रपटात विल दिसणार आहे. पण चित्रपटात त्याची भूमिका काय असणार हे मात्र अजून कळू शकलेले नाही.

Leave a Comment