माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदाकारीसाठी पहा कलंकचे हे गाणे

madhuri-dixit
आपल्या दिलखेचक अदांनी ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षितने नेहमीच चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. तिच्या अप्रतिम अदांचे तिच्या नृत्यातून नेहमीच दर्शन घडले आहे. आता आपल्या बहारदार नृत्याने पुन्हा एकदा चाहत्यांवर भूरळ पाडण्यासाठी माधुरी परतली आहे. तिच्या नृत्याची दमदार झलक चाहत्यांना ‘कलंक’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘तबाह हो गये’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

या चित्रपटात ‘बहार बेगम’ ही भूमिका माधुरी साकारत असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ‘तबाह हो गये’ गाण्यात चाहत्यांवर भूरळ पाडत आहेत. या गाण्याला कोरियोग्राफ रेमो डिसुजा आणि सरोज खान यांनी केले आहे. तर, श्रेया घोषालच्या आवाजाचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून ‘कलंक’ चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दलचे प्रत्येक अपडेट्स करण जोहर चाहत्यांशी शेअर करत असतो. वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दिक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा, अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment