अफ्रिकेतील या सर्वात श्रीमंत व्यक्तिने कशा साठी काढले बँकेतील सर्व पैसे

rich
अबुजा- अफ्रिकेतील एका बँकेतून त्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माणले जाणारे अलीको डेंगोटे यांनी जाऊन आपल्या खात्यात जमा असलेले 10 लाख डॉलर (69.23 कोटी रूपये) काढले आणि कारमध्ये भरून घरी घेऊन गेल्यानंतर आपल्या पैशांना त्याने डोळे भरून पाहीले. त्याला जेव्हा विश्वास बसला की, हे कागदाचे तुकडे नसून खरे पैसे आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बँकेत सगळे पैसे जमा केले.

शनिवारी आयव्हरी कोस्टमध्ये एक फोरममध्ये त्यांनी सांगितले की, त्यांना पाहायचे होते की, ते खरच श्रीमंत व्यक्ती आहेत का? त्यांना आपले सगळे पैसे पाहून विश्वास बसला की, आपण खरच श्रीमंत आहोत, त्यांनी त्यानंतर बँकेत सगळे पैसे परत जमा केले. डेंगोटे हे अफ्रीकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ते सिमेंटपासून पीठापर्यंतचा व्यवसाय करतात. त्यांना अफ्रिकेतील मॅन्युफ्रॅक्चरिंग टायकून म्हटले जाते.

Leave a Comment