पाकमधील पॉपकॉर्न विक्रेत्याने बनवले विमान, चाचणी दरम्यान पकडला गेला

aircraft
पाकपट्टन – घरातच जुगाड करून पाकिस्तानामधील पाकपट्टन येथील पॉपकॉर्न विक्रेता महंमद फैयाज याने विमान तयार केले. याची तो रस्त्यावर चाचणी घेत होता त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.
aircraft1
या प्रकरणी तेथील नागरी उड्डयन प्राधिकरणाने (सीएए) म्हटले, चाचणी करण्यासाठी संबंधिताने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती. तर स्थानिक माध्यमांशी बोलताना फैयाजने म्हटले, सीएएला विमानासंबंधीची माहिती मी दिली होती. पण त्यांनी कोणत्याही प्रकारे उत्तर दिले नाही. मी त्यानंतर विना परवानगी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, माझ्याकडे उडणारे असे स्वत:चे यंत्र हवे असे वाटत होते. मला नॅशनल जिओग्राफिक चॅनेल याची प्रेरणा पाहून मिळाली. मी त्यासाठी स्वत:चे शेत देखील विकले होते. फैयाज याने दिलेल्या माहितीनुसार, चाचणी घेताना आपण हवेत अनेक फेऱ्या मारल्या. परंतु सीएएच्या परवानगीशिवाय विमानोड्डाण केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे विमान हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते.

Leave a Comment