धुळ्यातून अपक्ष लढणार लोकसभा निवडणूक अनिल गोटे

anil-gote
धुळे – मुंबई येथे पक्षश्रेष्ठींकडे आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा सादर केला आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. आपण राजीनामा स्थानिक राजकारणातील कुरघोडीना कंटाळून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सोमवारी आपल्या भाजप सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा धुळे शहराचे भाजपचे आमदार गोटे यांनी सादर केला. धुळे लोकसभा मतदार संघातून ते अपक्ष लढणार आहेत. ते यासाठी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

गोटेंचे आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये धुळे महापालिका निवडणुकीपासून वितुष्ठ निर्माण झाले होते. त्यांना महापालिका निवडणुकीत डावलण्यात आल्यामुळे त्यांच्यात आणि डॉ. सुभाष भामरे तसेच मंत्री गिरीष महाजन यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले होते. महाजनांवर त्यांनी आरोप केले असून पक्षातील कुरघोडीना कंटाळून आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाने भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment