‘या’ महिलेमुळे मोडला जेफ बेजोस यांचा संसार

jeff-bezos
नुकताच अ‍ॅमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी लोकांमध्ये बेजोस यांची समजूतदार पत्नी आणि त्यांच्या 4 मुलांसोबत ते खूश असल्याची चर्चा होती. पण हा आनंद तात्पुरताच होता. कारण जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेंजी यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
jeff-bezos1
पण या दोघांमध्ये नेमके असे काय झाले ज्यामुळे दोघांनी 4 एप्रिलला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नुकताच बेजोस आणि त्यांच्या पत्नीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. मग असे काय झाले ज्यामुळे बेजोस यांच्या पत्नीने तडकाफडकी एवढा मोठा निर्णय घेतला. यामागचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कधीही माध्यमांसमोर जेफ बेजोस त्यांच्या पत्नीचे कौतुक करताना दिसले नाहीत. बेजोस यांच्या पत्नी मॅकेंजी यांचे म्हणणे आहे जेफ बेजोस यांना एक सुंदर तरुणी आवडते. त्या तरुणीवर त्यांचे प्रेम आहे.
jeff-bezos2
लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानंतर अचानक हॉलिवूडमधील अभिनेत्रीसोबत बेजोस दिसले. ती दिसायला अत्यंत सुंदर आहे. या अभिनेत्रीसोबत बेजोस अनेकदा हॉटेलमध्येही दिसले होते. पण बेजोस यांनी प्रत्येक वेळी अभिनेत्रीवर प्रेम असल्याची बातमी दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अ‍ॅमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत तणावाचे वातावरण निर्माण झाले. भांडणे होऊ लागली. दोघेही काही महिन्यांपासून वेगवेगळे राहात असल्याची चर्चाही होती. त्यानंतर बेजोस यांच्या पत्नीने ट्विटरवरून वेगळे राहात असल्याची माहिती दिली आणि चर्चांना उधाण आले. ती तरूणी कोण आहे? जिच्यावर अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस एवढे फिदा झाले आहेत.
jeff-bezos3
बेजोस हॉलिवूडमधील अभिनेत्री लॉरेन सांचेजवर फिदा झाले आहेत. अ‍ॅमेझॉनचे काही प्रोजेक्ट्सही लॉरेन सांचेजने केल्याची माहिती आहे. अनेक वेळा लॉरेन सांचेज आणि जेफ बेजोस यांना एकत्र पाहिले आहे. लॉरेन सांचेज ही अमेरिकेत काही काळ सूत्रसंचालक म्हणून काम करत होती. त्यानंतर हॉलिवूडमधील एका दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. मात्र लग्न फार काळ टिकू शकले नाही. लॉरेनने हॉलिवूडमधील दिग्दर्शकासोबत घटस्फोट घेतला. लॉरेनची भेट काही दिवसांनंतर जेफ बेजोस यांच्याशी झाली.
jeff-bezos4
लॉरेनची जेफ बेजोस यांच्यासोबत काही भेटीनंतर जवळीक वाढली. अमेरिकेतील मीडियामध्ये जेफ बेजोस आणि लॉरेन यांच्या प्रेमाची तुफान चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मात्र जगातील करोडोंचे मालक जोसेफ यांच्या घरात मात्र वादळ आले. लॉरेन हेलिकॉप्टरची पायलट होती असेही बोलले जाते. दोघांनी हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास केल्याचीही चर्चा आहे. जेफ बेजोस आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर आता बेजोस पुन्हा लॉरेनसोबत विवाहबंधनात अडकणार का हे येणारा काळच ठरवणार आहे.

Leave a Comment