लंडन न्यायालयाने फेटाळली विजय माल्ल्याची याचिका

vijay-mallya
लंडन – भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून इंग्लंडमध्ये फरार गेलेल्या विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनकडून मंजुरी देण्यात आली असून ब्रिटन सरकारच्या या आदेशाविरोधात माल्ल्याने न्यायालयात अपील केली होती. दरम्यान, विजय माल्ल्याने प्रत्यार्पणाविरोधात केलेली याचिका लंडन न्यायालयाकडून फेटाळून लावली आहे.

ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने पैशांची अफरातफर आणि बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी माल्ल्याला प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. १० डिसेंबर २०१८ ला माल्ल्याला भारतीय न्यायालयांना उत्तर द्यावे लागेल, असे लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयाने म्हटले होते. ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांच्याकडून त्यानंतर माल्ल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी देण्यात आली होती. पण ब्रिटन सरकारच्या निर्णयाविरोधात विजय माल्ल्याने अपील केले होती. यामुळे आता माल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसांतच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment