संत्र्यासोबतच संत्र्याच्या बियाही आरोग्यास उपयुक्त

orange
संत्र्याप्रमाणे संत्र्याच्या बियांमध्येही क, बी ६ जीवनसत्व, मॅग्नेशियम, ओमेगा-३ स्निग्ध आम्ले आणि फायबर असते. त्याबरोबरच या बियांमध्ये पॅलमिटिक, ओलिक आणि लीनोलिक आम्लेही असतात. म्हणूनच संत्र्याचे सेवन केल्यानंतर बिया टाकून न देता त्या वळवून त्याची पूड करून, ही पूड पाण्याबरोबर घेतली असता आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. संत्र्याच्या बियांमध्ये क जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असते. यामुळे शरीरातील कोशिकांना अपायकारक असे फ्री रॅडीकल्स हटविण्यास मदत होते. या बियांच्या सेवनाने कोलनच्या कर्करोगाचा धोकाही पुष्कळ अंशी कमी होतो.
orange1
संत्र्याच्या बियांचे चूर्ण शक्तिवर्धक आहे. यामध्ये असलेली पॅलमिटिक, ओलिक आणि लीनोलिक आम्ले शरीरामध्ये स्फूर्ती निर्माण करणारी आहेत. त्यामुळे सातत्याने शारीरिक थकवा जाणवू लागल्यास या चूर्णाचे सेवन लाभदायक ठरू शकते. हे चूर्ण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही सहायक आहे. यामध्ये असलेले बी ६ हे जीवनसत्व आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेऊन शरीरातील स्नायूंना वेदनामुक्त ठेवणारे आहे.
orange2
संत्र्याच्या बियांच्या चूर्णामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेले क जीवनसत्व जैविक संक्रमणे रोखण्यास सहायक असते. तसेच याच्या नियमित सेवनाने शरीरातील घातक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील या चूर्णाचे सेवन लाभदायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment