सध्या पाँडेचरी या चित्रपटाच्या चित्रीकरणात अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बिझी आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले. हा चित्रपट सचिन कुंडलकरने स्मार्टफोनवर शूट करून अनोखा प्रयोग केला आहे. या चित्रपटात सईसोबत वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत.
तुम्ही पाहिला आहे का सईचा हॉट आणि बोल्ड अंदाज?
सई नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे बोल्ड फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर टाकत असते. यावेळच्या फिल्म फेअर अवॉर्डमध्ये सईचा ग्लॅमर तडका पाहायला मिळाला. सई ताम्हणकरने डेट विथ सई या वेबसिरीजमध्ये काम केले. ही वेबसीरिज जास्तीत जास्त लोक पाहतात. सईच्या पाँडेचरी चित्रपटाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आईचा शोध घेणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे.