विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघाचा काल दिल्ली कॅपिटल्ससोबत आमना सामना झाला. त्यावेळी विराटसेना हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानावर उतरली. जेव्हाही बेंगळुरूचा संघ घरच्या मैदानावर सांयकाळी चार वाजता खेळतो, ते तेव्हा हिरव्या रंगाची जर्सी घालतात.
का बरे आरसीबी खेळत असेल हिरव्या रंगाची जर्सी घालून?
गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी आरसीबीने हिरव्या रंगाची जर्सी घातली आहे. गो ग्रीन मोहिमेंतर्गत ही सुरुवात आरसीबीचे मालक सिद्धार्थ माल्ल्या यांच्या कल्पनेतून करण्यात आली आहे. आयपीएलच्या चौथ्या हंगामात कोच्ची टस्कर्सविरुद्ध आरसीबीचा संघ पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत खेळला होता. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला आरसीबीचा संघ एक झाडही भेट म्हणून देतो.