आणखी दोन राहुल गांधी वायनाडमधुन राहुल गांधी विरोधात लढवणार निवडणूक

rahul-gandhi
वायनाड : उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उतरले आहेत. राहुल गांधींना वायनायमध्ये थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण राहुल गांधी यांच्या विरोधात याठिकाणी तीन असे उमेदवार आहेत की ज्यांची नावे राहुल गांधींच्या नावाशी मिळती-जुळती आहेत.

वायनाडमधून राहुल गांधी यांच्याविरोधात के ई राहुल गांधी, त्रिसूरचे के एम शिवप्रसाद गांधी आणि अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे सदस्य कोयंबतूरचे के के राहुल गांधी हे निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यांना नावातील साम्यामुळे निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

या उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार के ई राहुल गांधी यांनी भाषाविज्ञान यामध्ये एमफिल केले असून ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. 5000 रुपये रोख रक्कम आणि बँकेत 515 रुपये त्यांच्याकडे आहेत. या व्यतिरिक्त त्यांकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.

के. राहुल गांधी हे पत्रकार आहेत, तर त्यांची पत्नी डॉक्टर आहे. के राहुल गांधी यांचे उत्पन्न 1 लाख 99 हजार रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 20 लाख रुपये आहे. तिसरे उमेदवार के एम शिवप्रसाद गांधी संस्कृतचे शिक्षक आहेत, त्यांची पत्नी कॉम्युटर ऑपरेटर आहे. राहुल गांधी यांच्यासह सारख्याच नावाचे आणखी तीन उमेदवार रिंगणात असल्याचे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याचा फटका राहुल गाधींनी बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment