माझ्या बायोपिकसाठी आलिया भट्टला शिकावी लागेल एक गोष्ट : माधुरी दीक्षित

madhuri-dixit
जर माझा बायोपिक बनवण्याचा विचार भविष्यात झाला तर आलिया भट्टने त्यामध्ये माझी भूमिका साकारावी, असे मत बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने व्यक्त केले आहे. परंतु आलियाला माझ्या बायोपिकसाठी तिच्या नृत्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. असेही माधुरी म्हणाली.

बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला बायोपिक्सचा ट्रेण्ड सुरु आहे. माधुरी दीक्षितला तिच्या बायोपिकमध्ये कोणाला पाहायला आवडेल, असा प्रश्न एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत देत असताना विचारला. तिने त्यावर उत्तर देताना आलियाचे नाव घेतले.

माधुरी म्हणाली की, मला माझ्या बायोपिकमध्ये आलियाला पाहायला आवडेल. ती एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या गल्ली बॉय, हायवे, राजी या चित्रपटातील अभिनयाने मी खूप प्रभावित झाले आहे. माझ्या बायोपिकसाठी आलिया परफेक्ट असली तरी तिला थोडे कथ्थक शिकावे लागेल. चांगले नृत्य ती करते. पण माझ्या बायोपिकसाठी तिला नृत्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

करण जोहरच्या आगामी कलंक या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट दोघीही एकत्र दिणार आहेत. 17 एप्रिल रोजी हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार असून यामध्ये आलिया-माधुरीसह संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Comment