बी-टाऊनमधील या अभिनेत्री घटस्फोटानंतरही आनंदी जीवनाचा घेत आहेत आस्वाद

divorce
बी-टाऊन अफेअर, लग्न आणि नंतर घटस्फोट हा काही गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. त्या क्षेत्रात ही आता प्रथाच पडली आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी खूप धामधूमीत लग्न केले पण त्यांचे लग्न काही काळापुरतचे मर्यादित राहिले. या यादीत शाहरुख खानची हिरोईन ते सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. बराच काळ अभिनय आणि बॉलिवूडपासून दूर असलेल्या या अभिनेत्री घटस्फोटानंतर आता आपल्या मुलांसोबत राहत असून अद्याप त्यांचे दुसरे लग्न करण्याचा अजिबात विचार नाही. त्याच अभिनेत्रींबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
divorce1
या यादीत सर्वात आधी अभिनेत्री करिश्मा कपूर येते. बॉलिवूड गाजवलेल्या करिश्माचे वैवाहिक जीवन मात्र तितकेसे आनंदी नव्हते. 2003मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी करिश्माने लग्न केले. पण या दोघांनीही 2016 मध्ये घटस्फोट घेतला. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलेसुद्धा आहेत. संजयने 2017 मध्ये मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केले, पण करिश्मा अद्याप सिंगल आहे. तिची दोन्ही मुले तिच्या सोबत राहत असून ती अनेकदा आपल्या मुलांसोबत एंजॉय करताना दिसते.
divorce2
2010मध्ये 90 व्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री मनिषा कोईराला बिझनेसमन सम्राट दहल सोबत लग्नाच्या बेडीत अडकली पण त्यांचे नात फार काळ टिकू शकले नाही आणि लग्नाच्या जेमतेम दोन वर्षातच ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्याचबरोबर माझा पती माझा सर्वात मोठा दुश्मन अशी फेसबुक पोस्टही मनिषाने केली होती. त्यानंतर मनिषाला कॅन्सरचाही सामना करावा लागला मात्र आता ती यातून पूर्णपणे सावरली असून आनंदात आपले जीवन जगत आहे.
divorce3
अभिनेत्री प्रीति झंगियानी ‘मोहब्बते’ चित्रपटातून चर्चेत आली पण सिनेसृष्टीत तिचे करिअर काही खास काही चालले नाही. ती 2008 मध्ये परवीन डबासशी विवाहबद्ध झाली. या दोघांमध्ये काही वर्ष सर्वकाही ठीक होते. पण मुलाचा जन्म झाल्यावर हे दोघेही वेगळे झाले आणि सध्या आपल्या मुलासोबत आनंदाने आपले जीवन जगत आहे.
divorce4
सध्या बॉलिवूडपासून शाहरुखच्या ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूड पदर्पण करणारी अभिनेत्री महिमा चौधरी दूर आहे. पहिला चित्रपटा सुपरहिट झालेल्या महिमाचे नंतरचे चित्रपटा खास कमाल करू शकले नाही. महिमाने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. पण फक्त 7 वर्ष त्यांचे नात टिकले त्यानंतर या दोघांनीही घटस्फोट घेतला. या दोघांचा एक मुलगा आहे ज्याला महिमा एकटी सांभाळते.
divorce5
अनेक वर्ष संगिता बिजलानी आणि सलमान खान यांचं अफेअर चर्चेत राहीले पण अझरुद्दीनशी संगीताने लग्न केले अझहरने संगीतासाठी त्याची पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. लग्नानंतर संगीताने इस्लाम कबूल करत आपले नाव बदलून आयशा ठेवले. पण 2010मध्ये अझहर आणि संगीता एकमेकांपासून वेगळे झाले. पण संगीता आणि सलमान अद्याप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

Leave a Comment