बचत खात्याचे नियम एसबीआयने बदलले

SBI
1 एप्रिलपासून बचत खात्या संदर्भातील नियमांमध्ये काही महत्वाचे बदल देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने केले आहेत. बँकेकडून बचत खात्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे.

नुकतेच एसबीआयने ग्राहकांसाठी केलेल्या फेरबदलांचा तोटा शहरी भागातील ग्राहकांना तर, फायदा ग्रामीण भागातील ग्राहकांना होणार आहे. एसबीआयच्या या नियमानुसार आपल्या ग्राहकांना बचत खात्यात मिनिमम रक्कम ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, या नियमांनुसार मिनिमम बॅलेंस नसल्यास आता 5 ते 15 रुपये पेनल्टी लागू शकते.
SBI1
आपल्या ग्राहकांची ४ भागात बँकेच्या वतीने विभागणी करण्यात आली आहे. यात मेट्रो, शहरी, अर्ध शहरी आणि ग्रामीण असे हे चार भाग आहेत. या आधारावर मिनिमम बॅलेंस 1000 ते 3000 ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, आता बँकेच्या खात्यात मिनिमम बॅंलेस नसल्यास पेनल्टी अधिक जीएसटी ही लागू होणार आहे. तरी लोकांमध्ये याबाबत संभ्रमावस्था असल्याकारणामुळे बँकेच्या वतीने किती रक्कम जमा असावी, याचा तपशील जारी केला आहे.

बँकेने जारी केलेल्या या तपशीलानुसार तुमच्या मिनिमम बॅलेंसवर आता जीएसटी लागू होणार आहे. एसबीआयच्या नियमांमुळे अनेक ग्राहकांनी आपली खाती बदलली होती. कारण गेल्या वर्षभरात दंडाच्या स्वरुपात जवळजवळ करोडो रुपयांची वसुली केली आहे.

Leave a Comment